तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलोची चांदीची तलवार आणि ढाल अर्पण!
◻️ हैदराबादच्या भाविकाची देवीचरणी अनोखी सेवा
रेड्डी हे आज कुटुंबियांसह श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात आले होते. दर्शनानंतर त्यांनी आपली श्रध्दा व्यक्त करत देवीच्या चरणी चांदीची तलवार आणि ढाल सुपूर्द केली. या अलंकारांचे एकूण वजन सव्वा दोन किलो इतके आहे. देवीच्या शस्त्रागारात आता या मौल्यवान दानाची भर पडली आहे.
या दानाबद्दल श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने रेड्डी यांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी तुळजापूर येथील स्थानिक नागरिक आणि मंदिर प्रशासनातील मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याप्रसंगी विकास वाणी, महेश गंजे यांच्यासह मंदिर संस्थानचे कर्मचारी आणि इतर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.