शिंदे साहेबचं हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0

शिंदे साहेबचं हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार - आमदार अमोल खताळ

◻️ शिवसेना स्थापनादिन साजरा; ​खासदार वाकचौरेच्या पाठीमागे उभे राहण्याची दिली ग्वाही

​संगमनेर LIVE | “हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय देणारे नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबचं हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आहेत," असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.

​शिवसेना स्थापना दिनानिमित्त संगमनेर येथे आयोजित शिवसेना महायुतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या पुढील वाटचालीवर आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

आमदार खताळ यांनी उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांना सल्ला देताना म्हटले की, “तुमचे सहा खासदार तुम्हाला सोडून गेले आहेत, तर त्यामागे नक्कीच काहीतरी मोठी कारणे असणार. त्यामुळे कोणालाही दोष देण्यापूर्वी उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे."

लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीवर भाष्य करताना खताळ म्हणाले, “जनतेने निवडून दिल्यावर मतदारसंघाचा विकास करणे ही आमची प्रमुख जबाबदारी आहे. विकासकामांना गती देण्यासाठी अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात. जनहित आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी सत्तेसोबत राहून काम करणे ही काळाची गरज आहे.” असे नमूद केले.

दरम्यान, या कार्यक्रमातून खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या राजकीय वाटचालीला आमदार खताळ यांनी पूर्ण पाठिंबा दिला. “शिवसेनेचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून, जिथे जिथे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना विरोध होईल, तिथे मी त्यांच्या पाठीमागे ढाल बनून खंबीरपणे उभा राहीन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, ​या कार्यक्रमात संगमनेर तालुक्यात शिवसेना संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आगामी काळात पक्षवाढीसह जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही आमदार खताळ यांनी कार्यकर्त्यांना केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !