​शरद पवारांसह दिग्गज नेत्यांची सौ. प्रभावती घोगरे यांच्या निवासस्थानी भेट

संगमनेर Live
0
​शरद पवारांसह दिग्गज नेत्यांची सौ. प्रभावती घोगरे यांच्या निवासस्थानी भेट

◻️ प्रवरा परिसराचे ऋणानुबंध जपत पवारांनी दिला आठवणींना उजाळा 

संगमनेर LIVE (​लोणी) | राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते तथा राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या दौऱ्यात त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, खासदार निलेश लंके, चंद्रकांत दळवी, डॉ. सुधीर तांबे आणि संदीप वर्पे आदि नेते उपस्थित होते.

शरद पवार यांच्या आगमनामुळे लोणी खुर्द परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फटाक्यांच्या आतिषबाजीत मान्यवरांचे जंगी स्वागत केले. या भेटीमुळे स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि युवकांमध्ये विशेष उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्व. चंद्रभानदादा घोगरे, स्व. शंकरनाना खर्डे, डॉ. अण्णासाहेब शिंदे आणि संपूर्ण प्रवरा परिसराच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. “आज बुधवार असून येथे बाजार भरतो," असे म्हणत त्यांनी लोणी परिसराशी असलेले आपले जुने ऋणानुबंध अधोरेखित केले.

या भेटी दरम्यान विशेष म्हणजे खासदार शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि सौ. प्रभावती घोगरे यांनी एकाच वाहनातून प्रवास केला. या प्रसंगाने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले असून, सौ. प्रभावती घोगरे यांच्याविषयी वरिष्ठ नेत्यांचा स्नेह आणि विश्वास स्पष्टपणे दिसून आला.

​दरम्यान, याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य एकनाथ घोगरे, अरुण कडू, बाळासाहेब विखे, सुरेंद्र खर्डे, सरपंच जनार्दन घोगरे, आबासाहेब आहेर, आप्पासाहेब घोगरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थित दिग्गज नेत्यांनी सौ. प्रभावती घोगरे यांना त्यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !