संगमनेर तालुक्यातील तीन आरोग्य उपकेंद्र पदनिर्मितीला मंजुरी - ​आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
संगमनेर तालुक्यातील तीन आरोग्य उपकेंद्र पदनिर्मितीला मंजुरी - ​आमदार अमोल खताळ

◻️ पेमगिरी, कुरकुंडी व कोठे बुद्रुक आरोग्य उपकेंद्रे होणार सक्षम

​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि दर्जेदार करण्याच्या उद्देशाने आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. तालुक्यातील पेमगिरी, कुरकुंडी व कोठे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसाठी आवश्यक नवीन पदनिर्मितीस राज्य शासनाने अधिकृत मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण रुग्णांना आता तत्पर आणि दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्याच परिसरात उपलब्ध होणार आहे.

राज्य शासनाने ज्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे बांधकाम ५० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे, अशा उपकेंद्रांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. या निर्णयाचा लाभ घेत आमदार खताळ यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे या तीनही उपकेंद्रांसाठी लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या आणि उपचारासाठी होणारी रुग्णांची गैरसोय लक्षात घेता, ही पदनिर्मिती अत्यंत गरजेची होती.

आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या पदनिर्मितीला मंजुरी दिली आहे. यामध्ये पेमगिरीसाठी १५ पदे, तर कुरकुंडी व कोठे बुद्रुक प्रत्येक केंद्रासाठी ४ पदे मंजूर करण्यात आली आहेत. मंजूर करण्यात आलेल्या एकूण पदांमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्त्री व पुरुष आरोग्य सहाय्यक, सहाय्यक परिचारिका, औषध निर्माता, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वाहनचालक आणि सफाईगार अशा विविध महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. या भरतीमुळे उपकेंद्रांमधील मनुष्यबळाचा अभाव दूर होऊन रुग्णांना एकाच छताखाली सर्व आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणासाठी तातडीने निर्णय घेतल्याबद्दल आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे विशेष आभार मानले आहेत. तर, या निर्णयामुळे परिसरातील अनेक गावांच्या आरोग्य व्यवस्थेला नवसंजीवनी मिळणार असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !