निरोगी जीवनासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम गरजेचा - डाॅ. सुप्रिया ढोकणे

संगमनेर Live
0
निरोगी जीवनासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम गरजेचा - डाॅ. सुप्रिया ढोकणे

◻️ मंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दाढ येथे मोफत आरोग्य शिबिर

संगमनेर LIVE (​लोणी) | आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार पध्दती अधिक प्रभावी आणि सोयीची होत असून, निरोगी जीवनासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ‘पायरेन्स’ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील यांनी केले.

​राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दाढ बुद्रुक (ता. राहाता) येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल व आयुर्वेद महाविद्यालय, लोणी आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. ढोकणे पाटील बोलत होत्या.

डॉ. सुप्रिया ढोकणे म्हणाल्या की, विखे पाटील परिवाराने नेहमीच सामाजिक कार्याला प्राधान्य दिले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या १०० खाटांच्या सुसज्ज आयुर्वेदिक रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आता शहराच्या धर्तीवर दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध झाली आहे. आयुर्वेद ही केवळ उपचार पध्दती नसून ती एक निरोगी जीवनशैली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात संतुलित आहार आणि व्यायामाचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.

उपसरपंच नकुल तांबे यांनी प्रास्ताविकात वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यात आरोग्य शिबिरासह आधार कार्ड नोंदणी, महिलांसाठी विशेष रक्त तपासणी, एसटी स्मार्ट कार्ड नोंदणी, गुणवंत विद्यार्थी सत्कार, वृक्षारोपण आणि आयुष्मान कार्ड शिबिर अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. तसेच, मंत्री विखे पाटील यांच्या उत्तम आरोग्यासाठी सामुदायिक रामरक्षा पठण, महामृत्युंजय मंत्रजप, हनुमान चालीसा आणि गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले होते.

​या कार्यक्रमात डॉ. श्याम भुतडा यांनी हॉस्पिटलच्या आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती दिली, तर आभार प्रदर्शन प्रशांत बनसोडे यांनी केले. आरोग्य शिबिरामुळे अनेक गरजू नागरिकांना मोफत तपासणी आणि उपचारांमधील सवलतींचा लाभ मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, यावेळी संचालक सुनील तांबे, प्रतापराव तांबे, सरपंच तात्यासाहेब सातपुते, उपसरपंच नकुल तांबे, पायरेन्सचे सचिव डॉ. निलेश बनकर, डॉ. योगेश निघुते, डॉ. श्याम भुतडा, सुभाष तांबे, अशोक दहिवळकर, भाऊसाहेब पाळंदे, डॉ. दीपक तांबे, डॉ. प्रमोद बोऱ्हाडे, बाळासाहेब सांगळे, सौ. सविता गाडेकर, संजय गाडेकर, प्रशांत बनसोडे, कैलास तांबे, राजेंद्र तांबे, प्रमोद बनसोडे, बाळासाहेब पाळंदे, सचिन वाणी, रवींद्र सातपुते, जॉन पाळंदे, अभिमन्यू कुमकर उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !