आमदार अमोल खताळाच्या पाठपुराव्यामुळे चार दशकांचे स्वप्न होणार साकार!

संगमनेर Live
0
आमदार अमोल खताळाच्या पाठपुराव्यामुळे चार दशकांचे स्वप्न होणार साकार!

◻️ शहरातील ​जाणता राजा मार्गावर कामगार रुग्णालयाच्या कामाला सुरूवात 

​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील तब्बल चार दशकांपासून प्रलंबित असलेले कामगार रुग्णालयाचे स्वप्न आता आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रत्यक्षात साकार होणार आहे. शहरातील जाणता राजा मार्गावर, स्टेट बॅकेच्या समोर असणाऱ्या इमारतीत या रुग्णालयाचे काम सुरू करण्यात आले असून, लवकरच हे रुग्णालय तालुक्यातील कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सेवेत दाखल होणार आहे.

कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या संगमनेरमधील कामगारांना उपचारासाठी नाशिक किंवा अहिल्यानगर सारख्या शहरांत धाव घ्यावी लागत होती. या प्रवासात कामगारांचा वेळ, पैसा आणि शारीरिक-मानसिक त्रास होत असे. मात्र, आता संगमनेरमध्येच रुग्णालय सुरू होत असल्याने कामगारांना स्थानिक पातळीवर प्राथमिक उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि विविध आरोग्य सुविधा मिळणार आहेत. यामुळे कामगारांना दर्जेदार आरोग्यसेवा जलद गतीने उपलब्ध होणार आहे.

अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्यामुळे विविध कामगार संघटना, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शासनाकडून मंजुरी मिळवून हा प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल कामगारांनी आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, या प्रकल्पाबाबत बोलताना शिवसेनेचे सुशील शेवाळे म्हणाले की, “जाणता राजा मार्गावर रुग्णालय सुरू झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यातील हजारो कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना थेट लाभ होणार आहे. सर्व सामान्यांना अधिक सक्षम आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल.” असे नमूद केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !