संगमनेर शहरात ‘श्री जगन्नाथ रथयात्रे’चा अपूर्व सोहळा संपन्न

संगमनेर Live
0
संगमनेर शहरात ‘श्री जगन्नाथ रथयात्रे’चा अपूर्व सोहळा संपन्न 

◻️ आमदार अमोल खताळ यांच्याकडून शहरवासीयांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना

संगमनेर LIVE | संगमनेर शहरात राजस्थानी ब्राह्मण उत्सव युवक-युवती समितीच्या वतीने श्री जगदीश जयंती व श्री जगन्नाथ रथोत्सव २०२६ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य श्री जगन्नाथ रथयात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी प्रभू श्री जगन्नाथांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच नगरपरिषदेजवळ महायुतीच्या वतीने उभारलेल्या स्वागत मंचावर उपस्थित राहून रथयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांचे स्वागत केले.

शहरातील बाजारपेठेतील श्री जगदीश मंदिरापासून रथयात्रेला प्रारंभ झाला. प्रभू श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा मातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. “जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे” या मंगलमय प्रार्थनेने रथयात्रेला प्रारंभ करण्यात आला. रथयात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. त्यांनी प्रभू श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. पारंपरिक वेशभूषा, धार्मिक उत्साह आणि शिस्तबध्द आयोजनामुळे रथयात्रेचे आकर्षण अधिकच वाढले.

यावेळी युवक समितीचे अध्यक्ष शुभम उपाध्ये, उपाध्यक्ष प्रितम खंडेलवाल, श्रेयस पंचारिया, खजिनदार ललित जोशी, सचिव ऋषिकेश बद्दर, रॅली प्रमुख लाला दायमा, तेजस ओझा, नीरज उपाध्ये, साई जोशी, वरुण ओझा तसेच युवती समितीच्या अध्यक्षा कोमल दायमा, उपाध्यक्षा शीतल जोशी, खजिनदार जयश्री असोपा, सचिव दीपाली बद्दर, पुनम दायमा  स्नेहा साखी, प्राची जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. 

दरम्यान, प्रभू श्री जगन्नाथांचे आशीर्वाद सर्वांवर सदैव राहावेत तसेच प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, अशी प्रार्थना आमदार अमोल खताळ यांनी प्रभू श्री जगन्नाथांच्या चरणी केली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !