प्रवरानगर येथे बुधवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

संगमनेर Live
0

प्रवरानगर येथे बुधवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

◻️ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत विविध योजनांचे वितरण 

संगमनेर LIVE (शिर्डी) | राज्य शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत बुधवार दि. २२ जुलै रोजी सकाळी १० वाजता प्रवरानगर येथील धनंजयराव गाडगीळ सभागृहात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शिबिरात राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विविध लाभांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूल विभागाने २२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात या कालावधीत एका दिवशी शिबिर आयोजित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभांचे वितरण या शिबिरातून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, हा या अभियानामागील प्रमुख उद्देश आहे.

प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात होणाऱ्या या शिबिरासाठी प्रशासकीय स्तरावरील सर्व तयारी पूर्ण झाली असून, महसूल, कृषी, आरोग्य,
कौशल्य विकास,महीला बचत  गटांना विविध योजनांच्या पात्र लाभार्थीना प्रमाणपत्र साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !