राहत्याच्या छत्रपती व्यापारी संकुलाच्या नूतनीकरणास प्रशासकीय मान्यता!

संगमनेर Live
0
राहत्याच्या छत्रपती व्यापारी संकुलाच्या नूतनीकरणास प्रशासकीय मान्यता!

◻️ डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; लवकरच प्रत्यक्ष कामाला होणार सुरुवात

संगमनेर LIVE (​राहाता) | राहाता शहरातील व्यापारी सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने राहाता नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या नूतनीकरणास तसेच उर्वरित विकासकामांना शासनाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे व्यापारी संकुलाचे रूपडे पालटणार असून, व्यापारी आणि नागरिकांना अत्यंत दर्जेदार व आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

​याबाबत माहिती देताना भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता शहराच्या सर्वांगीण विकासाला सातत्याने गती मिळत आहे. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन विविध विकासकामांना प्राधान्याने मंजुरी मिळवून दिली जात असून, त्याचाच एक भाग म्हणून या व्यापारी संकुलाच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ​या प्रक्रियेत राहाता नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचे विशेष पुढाकार आणि सहकार्य लाभले आहे.

​सदर कामांतर्गत व्यापारी संकुलातील आवश्यक दुरुस्ती, संपूर्ण नूतनीकरण तसेच प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात येणार आहेत. या प्रकल्पांतर्गत व्यापाऱ्यांना अधिक सुरक्षित, सुसज्ज व आधुनिक गाळे व सुविधा मिळणार असून, संकुलात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनाही उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहेत आणि या सर्वांमुळे राहाता शहराच्या व्यापारी व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

दरम्यान, ​प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे आता लवकरात लवकर पुढील कार्यवाहीला वेग दिला जाणार आहे. आवश्यक त्या सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे राहाता शहराच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार असून, हा विकास शहराच्या व्यावसायिक प्रगतीसाठी एक मैलाचा दगड ठरेल, असा दृढ विश्‍वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !