​आमदार अमोल खताळांकडून गुळवे कुटुंबांचे सांत्वन आणि मदतीची ग्वाही!

संगमनेर Live
0
​आमदार अमोल खताळांकडून गुळवे कुटुंबांचे सांत्वन आणि मदतीची ग्वाही!

◻️ सावरगाव तळ येथे शेततळ्यात बुडून आजोबा-नातवाचा झाला होता मृत्यू 


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. शेततळ्यात पडून श्रवेश संतोष गुळवे (वय १३) व त्याचे आजोबा पांडुरंग रखमा गुळवे (वय ६५) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे गुळवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण सावरगाव तळ परिसरावर शोककळा पसरली आहे.

​घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार अमोल खताळ यांनी तातडीने गुळवे कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. या संकटाच्या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण गुळवे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, शासनाच्या माध्यमातून कुटुंबाला योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार खताळ यांनी दिली.

​गुळवे कुटुंबाला आर्थिक दिलासा देण्यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. श्रवेश गुळवे हा शालेय शिक्षण घेत असल्याने त्याच्या कुटुंबाला राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेतून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच पांडुरंग गुळवे यांच्या अपघाती निधनाबाबत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून शासनाची मदत मिळावी, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत असल्याचे आमदार खताळांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ​या दुर्दैवी प्रसंगी कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, भाजप उपाध्यक्ष बाळासाहेब शेटे, सरपंच अनिता नेहे, ग्रामपंचायत अधिकारी मनिषा शिखरे, मंडळाधिकारी विश्‍वजीत चौगुले यांच्यासह संतोष गुळवे, सुरेश भालेराव, सुधाकर नेहे, लक्ष्मण नेहे, सोमनाथ जगदाळे, परसराम नेहे, रावसाहेब थिटमे, योगेश कचरे, संजय नेहे, नवनाथ नेहे, रघुनाथ गुळवे, कचरू दुधवडे आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !