आता जिल्ह्यात निर्भय वातावरणात रोजगारनिर्मिती होणार - मंत्री विखे पाटील
◻️ पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ७८ उद्योजकांची १३ हजार कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक!
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | अहिल्यानगर जिल्ह्यात ७८ उद्योजकांनी सुमारे १३ हजार कोटी रुपयांची केलेली गुंतवणूक औद्योगिक क्षेत्राला नवा आत्मविश्वास देणारी आहे. औद्यगिक विकासाच्या दृष्टीने निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणामुळे उद्योजक जिल्ह्यात निर्भयपणे गुंतवणूक करून रोजगार निर्माण करतील. असा विश्वास जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
शासनाच्या उद्योग विभागाच्या वतीने गुंतवणूक परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात ७८ उद्योगांशी उद्योग विभागाच्या माध्यमातून करार करण्यात आले. सुमारे १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक यामाध्यातून झाली आहे. सर्व उद्योजकांचा सन्मान मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात
गुंतवणूक परिषदेस आमदार काशिनाथ दाते, उद्योग विभागाच्या सहआयुक्त वृषाली सोने, उद्योजक अरविंद पारगावकर, औद्योगिक विकास मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी गणेश राठोड, जिल्हा उद्योग अधिकारी अशोक बेनके, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराचे अध्यक्ष अनिल मोहिते, विनायक देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
याप्रसंगी उद्योजकांशी संवाद साधतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, अहिल्यानगर जिल्हा मुख्य औद्यगिक केंद्र म्हणून पुढे येत आहे. यापुर्वी औद्योगिक विकासात थोडे नकारात्मक वातावरण होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात येत असलेल्या गुंतवणूकीचा लाभ जिल्ह्याला होत असल्याने औद्योगिक क्षेत्रात सकारत्मक वातावरण निर्माण होत असल्याचे समाधान व्यक्त केले.
जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी जागांची उपलब्धता करून दिल्यानंतर पहीला संरक्षण प्रकल्प निबे गृपच्या माध्यमातून जिल्ह्यात भविष्यात बेलवंडी, हरेगाव येथेही संरक्षण उत्पादनाचे प्रकल्प कार्वान्वित होणार असल्याचे सांगून, यापुर्वी असे प्रयत्न जिल्ह्यात झाले नाहीत. त्यामुळे औद्योगिक विकासात जिल्हा मागे राहीला. धाक दडपशाही मुळे उद्योग माघारी गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
उद्योजकांना सुरक्षा वाटेल, त्यांना पायाभूत सुविधा कामागारांना संरक्षण मिळेल असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी उद्योग विभागाला घ्यावी लागेल असे सुचित करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, सूक्ष्म आणि लघु उद्योगापासून ते मोठ्या उद्योगांच्या गुंतवणूकीसाठी युवक महीला पुढे येत असल्याचे समाधान असून, यातून नवा आत्मविश्वास औद्योगिक क्षेत्राला मिळेल. गुंतवणूक किती कोटीची यापेक्षाही तरूण उद्योजकांच्या धाडसाला महत्व आहे.
अहिल्यानगर जिल्हा छत्रपती संभाजी नगर आणि पुणे या मोठ्या औद्यगिक पट्ट्याला जोडणारे केंद्र झाले आहे. रस्ते विकास आणि शिर्डी विमानतळाचा विस्तार होत असून कार्गो हब निर्माण होईल. जिल्ह्यात सेमी कंडक्टरचा प्रकल्प आणण्यासाठी आपला प्रयत्न आहे. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उजनी प्रकल्पावर डेटा सेंटर उभारले जाणार आहे. सुमारे ९४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य सरकार करीत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.