गंगागिरी महाराज सप्ताहासाठी विखे कारखान्याकडून १०१ पोती साखर

संगमनेर Live
0
गंगागिरी महाराज सप्ताहासाठी विखे कारखान्याकडून १०१ पोती साखर

​◻️ विखे पाटील परीवाराने जपली वारकरी संप्रदायाशी असलेली बांधिलकी!


संगमनेर LIVE (​अनिल शेळके) | सद्गुरू महंत गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन धनगरवाडी (ता. राहाता) येथे करण्यात आले आहे. या भव्य आणि भक्तीमय सोहळ्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सप्ताह कमिटीला १०१ पोती साखर प्रदान करण्यात आली आहे. या माध्यमातून विखे पाटील परिवाराने वारकरी संप्रदाय आणि धार्मिक परंपरेतील आपले सक्रिय योगदान पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

​धनगरवाडी येथे हा सप्ताह घेण्याचा निर्णय झाल्यानंतर, राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने पावले उचलली. सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर गावाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांच्या कामासाठी त्यांनी ४ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करून रस्त्यांची कामे मार्गी लावली. भाविकांसाठी केलेल्या या महत्त्वपूर्ण सोयीबद्दल महंत रामगिरी महाराज यांनी मंत्री विखे पाटील यांचे जाहीररीत्या अभिनंदन करत त्यांचे आभार मानले.

​सप्ताहासाठी लागणाऱ्या साखरेची मोठी गरज ओळखून, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या वतीने १०१ पोती साखर सप्ताह कमिटीकडे सुपूर्द करण्यात आली.

​याप्रसंगी विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सोपानराव शिरसाठ, कार्यकारी संचालक (एम.डी.) महेश कोनापुरे, संचालक चांगदेव लाटे, लक्ष्मण ताठे, मुक्ताराम यादव यांच्यासह कारखान्याचे इतर पदाधिकारी, ग्रामस्थ आणि सप्ताह कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, ​जिल्ह्यातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांना नेहमीच पाठबळ देण्याची विखे पाटील परिवाराची जुनी परंपरा आहे. धनगरवाडीतील या सप्ताहाला कारखान्याच्या माध्यमातून दिलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल सप्ताह आयोजक, स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !