तरुणांना व्यसनाधीन करून देश अस्थिर करण्याचे षडयंत्र हाणून पाडा - मंत्री विखे पाटील
◻️ ‘ड्रग्जमुक्त श्रीरामपूर’ अभियानाला तरुणाईचा अभूतपूर्व प्रतिसाद!
◻️ रॅलीत पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधी व पोलिसांचा उत्स्फूर्त सहभाग
संगमनेर LIVE (श्रीरामपूर) | व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी पोलीस प्रशासानाने सुरू केलेले ड्रग्ज मुक्त श्रीरामपूर अभियान युवाशक्तीच्या योगदानमुळे यशस्वी होईल. असा विश्वास जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
श्रीरामपूर पोलीस प्रशासनाच्या वतीने ड्रग्ज मुक्त श्रीरामपूर अभियान सुरू केले आहे. यानिमिताने आयोजित केलेल्या विविध स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ आणि नशामुक्त समाज निर्माण करण्यासाठी सामुहीक शपथ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यानिमिताने शहरातून काढण्यात आलेल्या विद्यार्थीच्या भव्य रॅलित हजारो विद्यार्थ्यासह पालकमंत्र्यांनी सहभाग घेतला.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, युवा शक्तीच्या बळावरच विकासित भारताचे स्वप्न पूर्ण हैणार आहे. परंतू देशातील युवकांना व्यवसानाधीन करून देश आणि समाज अस्थिर करण्याचे षडयंत्र हाणून पाडायचे असेल सर्व समाज घटकांना एकत्रित येवून बिमोड करावा लागेल.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात नशामुक्त अभियान सुरू झाले आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने प्रत्येक तालुक्यात यासाठी घेतलेला पुढाकार महत्वाचा असून या मध्ये समाजातील प्रत्येक घटकांने योगदान देण्याची अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.
युवकांमध्ये नशेचे वाढते प्रमाण चिंताजनक असून, यासाठी प्रत्येकाने जागृत राहाण्याची गरज आहे. आपल्या शाळा महाविद्यालयातील वातावरण कोणी कलुषित होत असेल तर, वेळीच लक्षात आणून देण्याची जबाबदारी प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेवून शाळा महाविद्यालयाच्या व्यवस्थापनास आणि पोलीस प्रशासनास कळविण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.
याप्रसंगी आमदार हेमंत ओगले, श्रीमती मीनाताई जगधने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांची भाषण झाली. बोरावके महाविद्यालयातून अभियानाच्या पार्श्वभूमीवर भव्य रॅली काढण्यात आली. मंत्री विखे पाटील, आमदार हेमंत ओगले सर्व नागरीक पोलीस अधिकारी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.