काॅग्रेसच्या वरिष्ठ दरबारात सौ. प्रभावती घोगरेंची ‘गूँज’!

संगमनेर Live
0
काॅग्रेसच्या वरिष्ठ दरबारात सौ. प्रभावती घोगरेंची ‘गूँज’!

◻️ ​पुण्यातील कार्यक्रमात राहुल गांधींसह राज्यातील दिग्गजांच्या भेटी


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या ‘छात्रों की गूँज’ कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेसच्या सरचिटणीस सौ. प्रभावती घोगरे यांनी जोरदार राजकीय 'गूँज' निर्माण केली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील दिग्गजांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधला आहे.

​पुण्यात खासदार राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘छात्रों की गूँज’ हा कार्यक्रम विक्रमी गर्दीत पार पडला. या सभेला काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार शाहू महाराज छत्रपती, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार प्रणीती शिंदे, सतेज तथा बंटी पाटील, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार यशोमती ठाकूर, विश्‍वजीत कदम यांच्यासह पक्षातील अनेक नेते उपस्थित होते.

​या कार्यक्रमात सौ. प्रभावती घोगरे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या घेतलेल्या भेटी केवळ सदिच्छा भेटी राहिल्या नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, या संवादादरम्यान राज्यातील सद्य राजकीय परिस्थिती आणि विशेषतः ‘शिर्डी विधानसभा मतदारसंघात’ काॅग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्याच्या रणनीतीवर सविस्तर खलबते झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्रदेश काॅग्रेसच्या सरचिटणीसपदाची मोठी जबाबदारी मिळाल्यापासून सौ. प्रभावती घोगरे यांचा पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी थेट संपर्क वाढला आहे. पक्षाच्या विविध आघाड्यांवर आणि कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे. पुण्यातील कार्यक्रमात राज्यातील सर्वोच्च नेत्यांसोबतच्या त्यांच्या या सहज वावराने शिर्डीतील स्थानिक राजकारणात मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर, काॅग्रेस पक्षश्रेष्ठींचे शिर्डीवर विशेष लक्ष असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

या राजकीय घडामोडींवर बोलताना सौ. प्रभावती घोगरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, “पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्‍वास आणि दिलेली जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडत संघटना मजबूत करण्यावर माझा मुख्य भर आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघासह राज्यातील पक्षाच्या संघटनात्मक कामाला अधिक गती देण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी अविरत काम करत राहणार आहे.” असे नमूद केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !