पद्मश्री डॉ. विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उद्या ‘शेतकरी दिन’ साजरा होणार

संगमनेर Live
0
पद्मश्री डॉ. विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उद्या ‘शेतकरी दिन’ साजरा होणार

◻️ कृषी विभागाकडून विविध कार्यक्रमांचे नियोजन


संगमनेर LIVE (लोणी) | सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ उद्या, दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभरात ‘शेतकरी दिन’ साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संदर्भात कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध उपयुक्त व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालय व मंत्रालयीन स्तरावरून देण्यात आल्या आहेत.

दरवर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी राज्य सरकारकडून त्यांचा जयंती दिन हा ‘शेतकरी दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शनपर शिबिरे आणि आधुनिक तंत्रज्ञान विषयक कार्यक्रम आयोजित केले जातात. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी तळागाळातील शेतकऱ्यांना एकत्र आणून, त्यांच्या हक्कासाठी देशातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याची म्हणजेच सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. कृषी आणि सहकाराची योग्य सांगड घालूनच ग्रामीण भागाचा शाश्वत विकास साधता येतो, हा आदर्श त्यांनी देशासमोर ठेवला.

या ‘शेतकरी दिना'च्या निमित्ताने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी सहकार व कृषी क्षेत्रात केलेल्या क्रांतीकारी कार्याचे स्मरण व्हावे, तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व प्रयोगशील कार्य करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान व्हावा, या हेतूने राज्य सरकारने हा विशेष दिन साजरा करण्याची गौरवशाली परंपरा सुरू केली आहे. 

दरम्यान, उद्या, गुरुवारी (२७ ऑगस्ट) या शेतकरी दिनाचे औचित्याने कृषी विभागाच्या पुढाकारातून राज्यभरात विविध कृषी महोत्सवांचे आणि शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !