जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवा - मंत्री विखे पाटील
◻️ श्रीरामपूर येथील दुबैय्या कुटुंबियांच्या उपोषणाला पालकमंत्र्यांची भेट
संगमनेर LIVE (श्रीरामपूर) | शहरातील युवा उद्योजक आकाश दुबैय्या यांच्या हत्येची घटना अंत्यत दुर्देवी असून, गोपनियता पाळून तपास सुरू आहे. घटनेच्या मुळापर्यत जाण्यासाठी पोलीसांचा प्रयत्न आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिकचे कोबिंग ऑपरेशन जिल्ह्यात राबविण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
एक महीन्यापुर्वी श्रीरामपूर शहरात आकाश दुबैय्या यांची हत्या झाली. मात्र मुख्य आरोपी अजून सापडत नसल्याच्या पार्श्वभूमीवर दुबैया कुटुंबियांनी दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. मंत्री विखे पाटील यांनी उपोषण स्थळी येवून त्यांची भेट घेतली. दुबैय्या परिवाराच्या भावना त्यांनी समजावून घेतल्या.
घडलेल्या घटनेबाबत कुटूंबियाच्या भावना अतिशय तीव्र असून, जनते मध्येही घटनेबाबत अधिक चीड आहे. आज पर्यत झालेल्या तपासाबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना माध्यमांसमोर माहीती देण्यास सांगितले असून, यामुळे तपास प्रक्रीयेबाबत समज गैरसमज दूर होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील गुन्हेगारी अटोक्यात आणण्यात पोलीस प्रशासनाला यश येत आहे. पण अधिकच्या प्रमाणात कोंबिग ऑपरेशन राबविण्याच्या सूचना आपण जिल्हा पोलीस प्रशासनास दिल्या असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
जिल्हा पोलीस आणि समाजा पुढे सध्या अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठ आव्हान असून, यावरच अधिक लक्ष केंद्रीत करून अमली पदार्थ तस्करी रोखण्यावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.
दरम्यान, श्रीरामपूरातील महाविद्यालयांमध्ये आमली पदार्थ विक्री करणारे रॅकेट उघड झाले असल्याची बाब अतिशय गंभीर आहे. यामध्ये कोणालाही पाठीशी न घालण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे मंत्री मंत्री विखे पाटील म्हणाले.