अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात ध्वजारोहण
◻️ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.
ध्वजारोहणानंतर उपस्थित सर्वांनी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन शिस्तबध्द पध्दतीने राष्ट्रगीत गायन केले. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी उपस्थितांना तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या ध्वजारोहण सोहळ्यासाठी अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा भिडे, भूसंपादन अधिकारी श्रीमती सावंत, उपजिल्हाधिकारी दळवी, नगर विकास विभागाचे सह संचालक पठारे, तहसीलदार मयूर बेरड व श्रीमती पुजारी, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आणि जिल्हा सूचना विभागाचे पवन टेंभुर्णे यांचा समावेश होता.
दरम्यान, जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस दलातील अधिकारी, निमंत्रित नागरिकांनी ध्वजारोहण सोहळ्यानंतर एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.