उंबरी बाळापूर येथे महंत सोमेश्‍वरगिरी महाराज पुण्यतिथी साजरी

संगमनेर Live
0

उंबरी बाळापूर येथे महंत सोमेश्‍वरगिरी महाराज पुण्यतिथी साजरी

◻️ ​संगीत भारुड अन् उपस्थिताना महाप्रसादाचे वाटप


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | श्री क्षेत्र सारला बेट येथे अध्यात्मिक परंपरा सुरू करणारे योगीराज संत श्री गंगागिरी महाराज यांनी प्रज्वलित केलेली भक्ती आणि अध्यात्म धर्माची ज्योत अखंडपणे तेवत ठेवणारे महंत सोमेश्‍वरगिरी महाराज उर्फ कोंडाजी काका यांचा पुण्यतिथी सोहळा उंबरी बाळापूर (ता. संगमनेर) येथील श्री संकटेश्‍वर महादेव मंदिरात मंगलमय वातावरणात गुरुवारी (दि. १३) पार पडला. 

संत परंपरेचे पाईक असलेल्या सोमेश्‍वरगिरी महाराजांचे उंबरी बाळापूर येथे प्रदीर्घ काळ वास्तव्य होते. त्यामुळे गावात अनेक वर्षांपासून त्यांची पुण्यतिथी श्रावण महिन्याच्या पहिल्याचं दिवशी परंपरेने साजरी केली जाते. ​गुरुवारी सकाळी श्री सोमेश्‍वरगिरी महाराजांच्या प्रतिमेची फुलांनी सजवलेल्या पालखीतून संपूर्ण गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ठिकठिकाणी सुवासिनींनी प्रतिमेचे पूजन केले. 

दरम्यान, ​मिरवणुकीनंतर संकटेश्‍वर महादेव मंदिर प्रांगणात भजन व संगीत भारुड कार्यक्रम पार पडला. तसेच महाआरती करण्यात आली. यानंतर परंपरेनुसार आमटी आणि भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी उंबरी बाळापूर ग्रामस्थांसह पंचक्रोशीतून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !