पिंप्री-लौकी अजमपूर येथील‌ ब्राह्मण ओढ्याच्या कामांचा शुभारंभ

संगमनेर Live
0
पिंप्री-लौकी अजमपूर येथील‌ ब्राह्मण ओढ्याच्या कामांचा शुभारंभ

◻️ पालकमंत्री विखे पाटलांच्या माध्यमातून २१ लाखांचा निधी मंजूर


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पिंप्री-लौकी अजमपूर (ता. संगमनेर) गावातील ‘ब्राह्मण ओढा' या ओढ्याच्या खोलीकरण आणि मजबुतीकरण कामासाठी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभ शनिवारी (दि. २२) करण्यात आला.

​या प्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब लावरे, भाजप नेते भारत गीते, अशोक गीते, उपसरपंच बाजीराव गीते, भाऊसाहेब मुंढे, भीमराज गिते, गोवर्धन गिते, गणपत गिते, सुभाष मुंढे, सूर्यभान गीते, सोमनाथ गीते, चांगदेव आव्हाड, मंगेश गीते, बाजीराव गीते, भानुदास गीते, सोमनाथ गीते, संजय गाडेकर, तुकाराम गीते, दादाहरी गीते, प्रशांत तांबे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी “गावाचा शाश्‍वत विकास साधायचा असेल, तर राजकीय आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एका एकत्र आले पाहिजे," असे आवाहन भाजप नेते भारत गीते यांनी केले. तर, २१ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी विखे पाटील कुटुंबाचे आभार मानले आहेत.
Show quoted text

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !