‘वारकरी वाईब्स' मध्ये टाळ - मृदंगाच्या गजरात तरुणाई भक्तिरसात तल्लीन!

संगमनेर Live
0
‘वारकरी वाईब्स' मध्ये टाळ - मृदंगाच्या गजरात तरुणाई भक्तिरसात तल्लीन!

◻️ कामिका एकादशीनिमित्त संगमनेर ​शिवसेना महायुतीचा उपक्रम


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | कामिका एकादशीच्या पावन मुहूर्तावर शिवसेना महायुती, संगमनेर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘वारकरी वाईब्स’ हा भव्य सांगीतिक सोहळा भक्तिमय आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विठ्ठल नामाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि संतांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. संगमनेरकर नागरिकांनी या भक्ती आणि शक्तीच्या अनोख्या मिलाफला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

​वारकरी संप्रदायाची समृध्द परंपरा, संतांची शिकवण आणि भक्तीचे विचार नव्या पिढीपर्यंत रंजक पद्ध्तीने पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वारकरी संस्कृतीला आधुनिक सांगीतिक सादरीकरणाची सुरेल जोड देत तरुण वर्गाला विठ्ठल भक्तीशी जोडण्याचा हा प्रयत्न कमालीचा यशस्वी ठरला.

​कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्यासह शिवसेना महायुतीच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. सोहळ्यात स्थानिक कलाकारांनी संत ज्ञानेश्‍वर माऊली, संत तुकाराम महाराज आणि इतर थोर संतांच्या अभंगांचे अप्रतिम सादरीकरण केले. टाळ - मृदंगाच्या तालावर आणि विठ्ठलाच्या जयघोषात उपस्थित भाविक तल्लीन होऊन नाचताना दिसले. संगमनेरच्या सांस्कृतिक विश्‍वासावर या कार्यक्रमाने एक वेगळीच छाप सोडली आहे.

“​संगमनेरमध्ये आयोजित वारकरी वाईब्स या भक्तिमय सोहळ्याला तालुक्यातील कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पारंपरिक संस्कृती आणि आधुनिक संगीताची सांगड घालत सादर झालेल्या कलाविष्कारांनी सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संगमनेरमधील सुप्त कलागुणांना एक प्रभावी व्यासपीठ मिळाले आहे.” अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !