दुबई व मुंबईतील भाविकांकडून साईचरणी २० लाखांची सुवर्ण स्वस्तिके अर्पण

संगमनेर Live
0
दुबई व मुंबईतील भाविकांकडून साईचरणी २० लाखांची सुवर्ण स्वस्तिके अर्पण

◻️ श्री साईंबाबाच्या मूर्तीमागील भिंतीवर केली प्रतिष्ठापना


संगमनेर LIVE (अनिल शेळके)| लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिर्डीच्या श्री साईबाबांच्या चरणी देश-विदेशातील साईभक्तांकडून रोख रकमेसह मौल्यवान वस्तूंचे दान सातत्याने केले जाते. 

याच अपार श्रध्दाभावातून एकाच वेळी दुबई आणि मुंबई येथील दोन वेगवेगळ्या साईभक्तांनी बाबांच्या चरणी आकर्षक नक्षीकाम असलेली दोन ‘सुवर्ण स्वस्तिके’ अर्पण केली आहेत. या दोन्ही स्वस्तिकांचे एकूण वजन १६२ ग्रॅम असून, बाजारभावानुसार त्यांची एकत्रित किंमत २० लाख ६१ हजार ६१२ रुपये इतकी आहे.


​संस्थानने दिलेल्या माहितीनुसार, दुबई येथील साईभक्ताने ८२ ग्रॅम वजनाचे अत्यंत देखणे व बारीक नक्षीकाम असलेले सुवर्ण स्वस्तिक बाबांच्या चरणी अर्पण केले. तर मुंबई येथील एका साईभक्ताने ८० ग्रॅम वजनाचे तितकेच आकर्षक दुसरे सुवर्ण स्वस्तिक दान केले. ही दोन्ही सुवर्ण स्वस्तिके मुख्य समाधी मंदिरात श्री साईबाबांच्या मूळ मूर्तीशेजारील मागील भिंतीवर सन्मानपूर्वक बसविण्यात आली आहेत. भाविकांच्या इच्छेनुसार व विनंतीवरून त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत.

दरम्यान, ​या मौल्यवान देणगीचा स्वीकार केल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दोन्ही देणगीदार भाविकांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !