अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय बीएएमएसचा शंभर टक्के निकाल
◻️ विशाखा बिरादार प्रथम, साक्षी माथनिकर द्वितीय तर सिध्दी धायबर तृतीय
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी-२०२६ सत्राच्या परीक्षेत मांचीहिल (ता. संगमनेर) येथील अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालयाचा अंतिम (चतुर्थ) वर्ष बी.ए.एम.एस. परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून, संस्थेने आपली १०० टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे.
या परीक्षेसाठी महाविद्यालयातून एकूण ९० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि हे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. निकालात यंदाही विद्यार्थिनींनी बाजी मारत गुणवत्ता यादीवर आपले नाव कोरले आहे.
यामध्ये कु. विशाखा मधुकर बिरादार हिने १७९१ गुणांसह महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला, तर कु. साक्षी संजय माथनीकर हिने १७८८ गुणांसह द्वितीय आणि कु. सिध्दी अशोक धायबर हिने १७७२ गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला.
दरम्यान, मांचीहिल शिक्षण संकुलाचे संस्थापक ॲड. शाळीग्राम होडगर, संचालिका नीलिमा गुणे, विश्वस्त डॉ. शैलेन्द्रसिंह होडगर, विश्वस्त डॉ. दिग्विजयसिंह होडगर, अध्यक्ष विजय पिसे, उपाध्यक्ष अण्णासाहेब बलमे, प्राचार्य डॉ. श्यामल निर्मळ, डॉ. संजीव लोखंडे, उपप्राचार्य डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ. जितेंद्र शिंपी, डॉ. चंद्रकांत गिरगुणे, अधिक्षक रंगनाथ गिते, हॉस्पिटलचे अधिक्षक डॉ. राजन कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी दत्ता शिंदे, संगणक विभागाचे अशोक पर्वत तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यी, शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन केले आहे.